Wednesday, October 27, 2010

खंडोजी बल्लाळ !

जुवे बेट मराठ्यांनी ताब्यात घेताच विजरई हबकला. आता त्या बेटावरुन एक खाडी पार केली की जुन्या गोव्यातच मराठ्यांचा प्रवेश होनार होता ! भयकातर झाल्या फिरंगी पाद्रयांनी, विजरईच्या तातड़ीच्या आज्ञेने सेन्ट झेवियरच्या चर्चमधील घंटा धोका म्हनुन रात्रीच्याच अखंड बदडायला सुरुवात केली ! बिचोलीहुन आलेला अकबर ही या हल्ल्यात राजांबरोबर होता. एकदा त्याने जंजी-यावर खाड़ीच भरुन काढु बघनारे राजे प्रत्यक्ष समोर पाहीले होते.
आता गोव्याची खैर नाही हे तो मनोमन जानुन होता. जुवे घेतल्याच्या दुस-याच दिवशी विजरई चारशे सैनीकांसह भल्या पाहटेच, ते परत घेन्यासाठी खाडी पार करुन निकराने चालुन आला. टेकडीवरचे राजे, त्याला टेकडी चढु देन्यासाठी प्रथम गुमान राहिले. तो मा-याच्या ट्प्प्यात येताच टेकडीवरुन दगडी गुंड बरसवत राजे सैन्यासह टेकडी उतरु लागले. " पळा ~ पळा~ ! " चालुन आलेले फिरंगी मांडाची घोडी, नीट टेकडी उतरेनात म्हनुन ती टाकुनच पळु लागले. त्यांना कळेना मावळ्यांचं भिर्यं केवढ आहे ! यातच बगलेने आलेली तिनशे स्वारांची कुमक राजांना मिळाली. जुवे बेटाच्या लगतच्या टेकड्यांवरुन गोव्यातले फिरंगी विचित्र नजारा बघु लागले. उतरंडीवरुन तेगी पेलत धावुन येनारे मावळे आनी विजरईसह जीव घेवुन पळ्नारे फिरंगी ! चार मावळ्यांनी विजरईचा घोडा घेरलेला बघताच काळ्जे चरकली फिरंग्यांची. डोम रोड्रीगो घोडा फेकत विजरईच्या मदतीला आला म्हनुन जीवे वाचला तो ! तरीही तलवारीचा एक निसट्ता वार बगलेला बसुन घायाळ झालाच तो. रोड्रीगो केवढ्याने तरी ओरड्ला - "खाडी पकडा पळा." भेदरलेला, रक्तबंबाळ विजरई खाडीच्या रोखाने जीव तोडुन जनावर फेकु लागला. त्याच्यावरच नजर खिळ्वुन समोरच्या फिरंगी धारक-यांशी लढ्ना-या राजांनी आपला 'चंद्रावत' कौशल्याने बाहेर काढ्ला. विजरईच्याच पाठ्लागावर फेकला. टेकडीवरच्या बघ्यांना कधी नव्हे असा नजारा बघने भाग पड्त होते. पुढे घायाळ, जीव बचावण्यासाठी दौड्नारा आपला पार भेदरलेला विजरई कोंद-द-अल्वोर आणि त्याला गाठ्ण्यासाठी तलवार पेलुन धावनारा सैतान 'संबा !' राजे एकलेच विजरईच्या मागे धावताहेत हे पाहुन चलाख खंडोजीनेही आपला घोडा त्यांच्या मागे दौड्ता काढ्ला. गर्जत्या, फेसाळ्त्या, भरतीच्या खाडीतच भेदरलेल्या विजरईने घोडा घातला. पुरा गर्भगळीत झालेला विजरई प्राणभयाने सपासप खारट पाणी तोडत मधे उभी असलेली होडी गाठ्ण्यासाठी जिवाचे रान करु लागला. होडीही त्याच्या रोखाने सरकु लागली. चन्द्रावतासह खाडीकाठाकडे दौड्नारे राजे चुट्पुटत ओरड्ले -"सोडू नको त्यास ! उभी गावे जाळ्तो - बाट्वतो -" आणि पाठ्लागावरच्या बेभान,संतप्त राजांनी मांडाखालचा चंद्रावतच अनावर चुट्पुटीने दमदार टाच भरत थेट खाडीतच घुसविला !! खारट पाण्याचे चौफेर फव्वारेच फव्वारे उडाले. दहा हात आत घुसलेला चंद्रावत खाडीच्या, भरतीच्या ओढीला हां-हां म्हनता वाह्तीला लागला. विजरईने होडी गाठ्लेली बघुन आणी त्याला मारायला धावुन येनारा 'संबाच' घोड्यासह वाह्तीला लागलेला बघुन टेकडीवरचे बघे जल्लोषाने टाळ्या पिटु लागले. राजे चंद्रावताच्या रिकिबीतील पाय आता सोडवू बघत होते. ते सुटले. एका हाताने वहातिचा चंद्रावत आवरत दुस-या हाताच्या बलाने तरंगते राजे चंद्रावतासह वहातिला लागले. टेकडयावर आता टाळ्या-आरोळ्यांचा पाउस पडू लागला. एकच क्षण पण उभे आयुष्य सरकवून गेला तो राज्यांच्या डोळ्यासमोर. मराठी दौलतच खारट पाण्यावर वहातिला लागली. आणि टेकडीवरील बघ्यांची दातखिळच बसली. त्याना घोड्यावरुनच एक माणुस जिवाच्या आकांताने खाड़ीच्या पाण्यात झेपावताना दिसला. सपासप हात मारत त्याने 'संबाला' पाते लवायच्या आत गाठलेही. आपल्या हाताची जोड़ देत देत तो वाहना-या संबाला खाड़ी काठाकडे आनु लागला. कायदे राजांच्या हातातून सुटताच चंद्रावत ही आंगच्या बलावर पोहोत काठाकडे निघाला. घोड्यावरून पाण्यात झेप घेणारा तो पानीदार वीर होता

खंडोजी बल्लाळ !

संभाजी महाराजांनी खंडोजीला पालखीचा मान दिला.. !

संभाजी महाराज आणि जंजिरा

जंजी-याचा तट आता पार उध्वस्त झाला होता. किनारपट्टीवरच्या टोपिकर, फिरंगी वखारिनी तर मुंबई, सूरत, गोवा आशा आपल्या बड्या दरबाराना खलीते धाडले - " सिद्दी खैरतची आता खैर नाही राजा शंभू जंजिरा दर्यात डूबवल्याखेरिज माघारी परतत नाही !."
जंजीरा आता एकाच जबर धड्केचा धनि होता. पंधरावा दिवस फटफटून उठला. नेहमिसारखे बख्तरधारी छत्रपति शहजाद्यासह शामियान्याबाहेर पडले. आज त्यांची चर्या मात्र वेगळीच दिसत होती.
"दादाजी दर्याची ओहोट केंव्हापासुन धरते ?" छत्रपतींनि सवाल टाकला.सवाल गोंधळात टाकनारा होता.

"कालपासुनच ओहोटीला सुरुवात झाली महाराज." दादाजी उत्तरले.
"महाराज गड़ी सोडायचा हुकुम व्हावा." येसाजी कंक आदबीने म्हणाले.

"नाही कंक काका, ही होड्क्याची विसकी पान्यावरून दूर हटवा. भुईला घ्या ती." कुणालाही न कळनारा हुकुम छत्रपतींच्या तोंडून सुटला.

"जी~! " येसाजी चमकले

असंख्य हाताने होड्या किना-यावर घेतल्या गेल्या.

एका एकी सर्वांनाच चक्रावून टाकतील असे पहाड़ी, हिमतवान, हुकुमी शंभूबोल साक्षात् दर्याच्या ही पोटात गोळा उठवित बाहेर पडले-
" ही खाड़ी भांगा देते तर जंजिरा आता पडतोच आहे ! सरलश्कर, दादाजी, विसाजी तळाचा हर एक धारकरी मेहनतिस जुंपा दगडगोट,लाकुडकाठी, कपडगोनी जे मिळेल त्याने भरतिपुर्वी ही खाड़ी रिचवून टाका !! जंजिरा पाडनेच आहे. आबासाहेबांस त्याविना शांति नाही, आम्हास चैन नाही"

निखारे पाखडत पसरावेत तसे बोल आज्ञा देत उधळले.
" बुजवून टाका हि खाडी."

पुराणात कधी काली प्रभु रामचंद्राचे नाव घेवुन सेनापति जाम्बुवंताने अशीच आज्ञा दिली होती वानर सेनेला.
हर हर महादेव म्हणत मावळी सेनेने रांगा धरल्या. एकमेवद्वितीय मात्र अगळा वेगळा यज्ञ सुरु झाला साक्षात् पानयज्ञ. !
दगड, विटा, लाकुड, फाटी मिळेल ते खाडीच्या वासल्या जबड्यात लोटन्यासाठी मावळी तुकड़यानी शिस्त धरली. पंधरावा दिवस मावळला.
सतत १० दिवस शेकडो मन चिजवस्तु पाण्यात अखंड कोसलली होती. खाडीचे पानी आता किना-याचा बांद फोडून हाताहातानी चौवाटा पसरु लागले.
एव्हडे दिवस एका एकी बंद झालेल्या तोफा बघून मरहटटयांची चाल काय याचा अंदाज पकडण्यासाठी सिद्दी खैरत व कासम जंजी-याच्या तटावर येवून किनारा निरखु लागले त्याना काहीच उमगेना.
पंचविसावी सांज कलतिला आली आणि सिद्दी खैरतच्या खोपडीत मशाल लागली !
" या खुदा~ ! तो~बा !" इंगलि ड़सल्यागत तो चित्कारला.
त्या रात्रि जंजिरा आपल्या हबशी हशमांवर सोडून हाय खाल्लेल्या सिद्दी खैरत- कासमनि एका होडीतुन चक्क जंजिरा सोडला ! दर्यात एका खड्काळ टेकडी वर ते जावून ठान झाले.
खाड़ी बगलांनि पसरु लागली ! फत्ते आणि फत्तेच तोंडावर दिसू लागली. अंगावरचा मळका जामा फेकून द्यावा तसे आज छत्रपति खाड़ीला पुरते हटवनार होते. मग कोंडला मर्दाना, हत्यारे पेलत जंजी-यावर थेट सुल्तानढवाच बडविनार होता ! हा सल निखळनार होता- कायमचा !
जे समोर चालले होते ते मावळ्यांचे 'दर्याभांडन' बघून पार दडपून गेलेला औरंगपुत्र अकबर शेजारी उभ्या दुर्गादासकडे हेतुपुर्वक पाहत म्हणाला
"राजासाब, आप खाते है क्या बिलकुल नाचीज है ! करते जो है वो खास दक्खनी मरहटटी !"

जंजी-याची मोहिम महाराजांना अर्धवट सोडावी लागली पण संभाजी महाराजांनि जंजिरा कायमचा खिळखिळा केला सिद्दी परत डोके वर काढू शकला नाही.

कृष्णाजी कंक..

विजरई आल्वोर आपल्या साथिदारांसह, भगदाड पड्ल्या फोंड्यात,
निकराचा आखरी हमला करुन शिरन्यासाठी फौजेचि शिस्त मांडुन तयारच होता. त्याचे वाजंत्रि फिरंगी पडघम
घुमवित फौजेला चेतना देत होते. चित्राविचित्र किलका-या उठ्वीत होते.
तटावरुन हवालदिल येसाजी-कृष्नाजी कंक त्यांच्याकडे बघत आपल्या धारक-यांना धीर देत गरगर फिरत होते.
आता फोंडा होता जिवा-मरणाच्या ऐन टोकावर. थोडा अवधी झाला तर....

एवढ्यात उठल्या ! हर हर म्हाद्देव'' च्या गगनस्पर्शी मर्दान्या कीलका-या उठल्या.
सरसरत येत्या धुळ्लोटांतुन फड्फडत येणारा भगवा जरीपट्का येसाजी-कृष्नाजिंना तटावरनं दिसला.
पुरा फोंडा कोट तो बघताना चैतन्याने कसा सळ्सळुन उठला. ऐलतीराला त्याने साद दिली 'हर हर म्हाद्देव '
फोंडाही पैलतिरावरुन कडाडला.

मध्ये सापडलेले फिरंगी गोंधळुन मागे वळ्ताना
कुजबुजु लागले - '' ता पळय. राजा इलो !'' हा, हा म्हनता विजरईने अंग मोडुन मांड्ल्या सैन्याची
शिस्त पार विस्कटली. तसे तटावरचे मावळे तर आनंदी जल्लोषाने आरोळ्या ठोकू लागले.
भिडले ! पायदळ मध्ये घेवुन पाचहजार घोड्दळासह संभाजीराजे थेट कोट फोंड्याच्या पायथ्याला भिडले.
घेराचा आता रंगच पार पालटला. बगलेला उभ्या एकाही फिरंग्याची हत्याराला हात घालायची हिमंत काही झाली नाही.
राजांचा तो उपराळ्याचा हल्ला नव्हताच. होता फोंडा गडचढीचा हमेशाचा प्रघात !
फोंड्यावर आता चक्क नौबती दुड्दुडु लागल्या !

येसजींनि आज आठ दिवसानंतर फोंड्याचा दरवाजा उघड्ला. सामने थोरल्यांचे अंकुर,
तडफदार, बांडे राजे बघताच डोळे अनेक आठवनिंनी डबडबुन आले म्हतारबाचे.
रिवाज ध्यायला ते कमरेत वाकताहेत हे बघुन राजे चट्कण पुढे झाले.
ऐन भराचे राजे आणि उतारवयाचे येसाजी यांची कड्कडुन उरभेट पडली.
गोव्यातल्या. किल्ले फोंड्यावर !

''कंक काका तटातील धारकरी बाहेर काढा टाकोटाकीने. फिरंगी माघार घेनार काढत्या पायांनी.
त्यांचा आताच पाठलाग केला पाहिजे !''
''जी.'' येसाजी-कृष्नाजी घायपाती, लवलवत्या पानांसारखे हलु लागले.

राजांनी अंदाज बांधला तसेच झाले होते. विजरईने माघारीचा हुकुम देताच,
त्याचीच वाट बघनारे त्याचे सैनीक आल्या वाटेने परतीसाठी सैरभैर पळु लागले.

दुर्भाटजवळ मावळी घोडाइतांनी माघार घेउन दौडत्या. फीरंग्यांना गाठले. मोर्चे धरलेल्या फिरंगी बंदुका कडकडल्या.
मावळी घोडी बिचकुन मूस्काटे फिरवु लागली. ते पाहुन येसाजी पुत्र कृष्नाजीच बिथरला !
त्याने आभाळाकडे गर्दन उठवुन सर्व घोडाइतांचे पाठकणे सुरसुरुन फुलवीत केवढीतरी मोठी किलकरी दिली.
''हर हर हर म्हाद्देव.'' ती लढाई होती दौडत येना-या मावळी भालाइतांची आनि बंदिस्त मोर्चे धरत
माघार घेना-या फिरंगाई बंदुकधा-यांची. फिरंगी मोर्चे पार विस्कलित झाले. घुसलेल्या काही मावळी
भालाइतांच्या भाल्यांच्या मा-यातुन खुद्द विजरई दोन वेळा नशिबाने सलामत निसटला होता.
कित्येक फिरंगी नदितुन पोहोत होते. कैक गळाभर पाण्यात जिव मुठीत धरुन उभे होते.
भेदरलेल्या विजरईने त्या लोकांची दुर्दशा डोळ्यांनी पाहीली.

आनि आनि अंगभर रक्ताने न्हालेला, मोर्चामागुन मोर्चे फोडत चाललेला,
अंगी गोळयाच गोळ्या झेलून फुलल्या पळसवृक्षासारखा रक्तबंबाळ दिसनरा,घामेजलेला कृष्नाजी
छाताडावर वर्मी गोळी लागताच ग्लानी येवुन घोड्यावरुन कोसळला !! ज्या ठिकानी जाया झालेले येसाजी,
कांबळ्यावर आणुन ठेवले होते त्या जागी, त्यांच्याशेजारीच कृष्नाजीलाही मावळ्यांनी घोंगडीवर झोपवीले.

आता दोन्हिकड्चा मार सुमार झाला होता. कित्येक फिरंगी आणी मावळे कामी आले होते. सांजावत आल्याने हत्यारे थांबली होती.
महाराज घोंगडिवर झोपविल्या येसाजीजवळ आले.
त्यांना बघुन क्षीन आवाजात म्हातारबा येसाजी म्हणाले, "सुक्षेम हाईसा न्हवं ?"
काय बोलावे तेच राजांना सुचेना. ते कृष्नाजीच्या घोंगडिजवळ आले. ती घोंगडीच रक्ताने चिंब झाली होती
कृष्नाजीने ग्लानीने भरलेले डोळे किलकिले केले. उजव्या पायपंजावर बसत राजे त्यांच्या जखमी देह्भर,
आईच्या मायेने हात फिरवित म्हनाले,

"ऐसा कैसा रे फुटोन गेलास तु कृष्णा !"

त्यांनी भवतिच्यांना आज्ञा केली, "या बापलेकास आत्ताच क-हाड प्रांती डोलीतुन त्यांच्या गावी पोचवा."

नेसरीच्या प्रतापराव गुजरांची,पुरंदराच्या मुरारबाजी आनी घोडखिंडीच्या बाजी देशपांड्यांची, मरणाचा लाकडी खोडा वळ्ता करूण घेना-या जंजी-याच्या कोंडाजी फर्जंदांची याद व्हावी असाच हा प्रसंग होता
- गोव्याच्या कृष्नाजी कंकाचा..

संभाजी महाराज आणि कृतघ्नं हिंदू समाज..



औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासून दूर ठेवणारे संभाजीराजे

संभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पायुष्यात केली, त्याचा दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदु बांधवाने कृतज्ञ राहिले पाहिजे. त्यांनी औरंगजेबाच्या आठ लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल सरदारांना लढाईत पराभूत करून त्यांना पळता भूई थोडी केली. त्यामुळे औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात लढत राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थान त्याच्या दडपणापासून मुक्‍त राहिला. ही संभाजीराजांची सगळयात मोठी कामगिरी म्हणावी लागेल. त्यांनी औरंगजेबाबरोबर तह केला असता, त्याचे मांडलिकत्व स्वीकारले असते, तर तो दोन-तीन वर्षांत पुन्हा उत्तरेत गेला असता; परंतु संभाजीराजांच्या संघर्षामुळे २७ वर्षे औरंगजेब दक्षिणेत अडकून राहिला आणि त्यामुळे उत्तरेत बुंदेलखंड, पंजाब आणि राजस्थान या ठिकाणी हिंदूंच्या नवीन सत्ता उदयाला येऊन हिंदु समाजाला सुरक्षितता लाभली.


संभाजीराजांच्या सामर्थ्याची पोर्तुगिजांना भीती
संभाजीराजांनी गोव्यावर आक्रमण करून धर्मवेड्या पोर्तुगिजांना नमवले. त्यांच्याशी तह करून त्यांना बांधून टाकले. गोव्यातील पोर्तुगिजांच्या धर्मप्रसाराला संभाजीराजांनी पायबंद घातला, त्यामुळे गोवा प्रदेशातील हिंदूंचे रक्षण झाले, हे विसरणे अशक्य आहे. पोर्तुगीज संभाजीराजांना प्रचंड भीत असत. त्यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे, ``सध्याच्या परिस्थितीत संभाजी महाराज हेच सर्वशक्‍तीमान आहेत, असा आमचा अनुभव आहे !'' शत्रूचे हे प्रमाणपत्र महाराजांच्या सामर्थ्याविषयी कल्पना देणारे आहे.

हिंदूंच्या शुद्धीकरणासाठी सदैव दक्ष असलेले संभाजी महाराज !
शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदु धर्मात घेतल्याची हकिकत सर्वांना माहीत आहेच; परंतु संभाजीराजांनी `शुद्धीकरणासाठी' आपल्या राज्यात स्वतंत्र विभाग स्थापन केला, हे विशेष महत्त्वाचे आहे. हरसूल गावच्या कुलकर्णी आडनावाच्या ब्राह्मणाची कथा संभाजीराजांच्या इतिहासात नोंदवलेली आहे. जबरदस्तीमुळे मुसलमान झालेला हा कुलकर्णी हिंदु धर्मात परत येण्यासाठी खूप प्रयत्‍न करत होता; परंतु स्थानिक ब्राह्मण त्याला दाद देत नव्हते. शेवटी हा ब्राह्मण संभाजीराजांना त्या धामधुमीच्या काळात भेटला आणि त्याने आपली व्यथा आपल्या राजासमोर मांडली. महाराजांनी ताबडतोब त्याच्या शुद्धीकरणाची व्यवस्था करून पुन्हा त्याला स्वधर्मात प्रवेश दिला. राजांच्या उदार धोरणामुळे कित्येक हिंदू पुन्हा स्वधर्मात आले !


संभाजीराजांचा जाज्वल्य धर्माभिमान !
संभाजीराजांच्या बलीदानाचा इतिहास लोकांना नीट माहीत नाही. १ फेब्रुवारी १६८९ या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गाऱ्हाणी ऐकत असतांना पकडले गेले. त्या वेळी मोगलांनी लाखो सैनिकांच्या बंदोबस्तात राजांची धिंड काढली. त्यांना शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या. विदूषकाचा पोषाख घालून, लाकडी सापळयात हातपाय अडकवण्यात आले. रक्‍तबंबाळ अवस्थेतील संभाजीराजांचे तत्कालीन चित्रकाराने रंगवलेले चित्र नगर येथील संग्रहालयात आजही आहे. असंख्य यातना सहन करणार्‍या या तेजस्वी हिंदु राजाची नजर अत्यंत क्रुद्ध आहे, असे त्या चित्रात दिसते. संभाजीराजांच्या स्वाभिमानाचा परिचय त्या क्रुद्ध नजरेवरूनच होतो.
१५ फेब्रुवारी १६८९ या दिवशी औरंगजेबाबरोबर राजांची दृष्टीभेट पेडगावच्या किल्ल्यात झाली. `काफिरांचा राजा सापडला' म्हणून औरंगजेबाने नमाज पढून अल्लाचे आभार मानून अत्यानंद व्यक्‍त केला. त्या वेळी संभाजीराजांना औरंगजेबाचा वजीर इरवलासखान याने शरण येण्याचे आवाहन केले. संतप्‍त संभाजीराजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला. तो एकनिर्णायक क्षण होता. महाराजांनी वैयक्‍तिक सुखाच्या अभिलाषेपेक्षा हिंदुत्वाचा अभिमान महत्त्वाचा मानला. आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान परंपरा त्यांनी जपली. यानंतर दोन दिवसांत औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यांना `मुसलमान झाल्यास जीवदान मिळेल', असे सांगण्यात आले; परंतु स्वाभिमानी संभाजीराजांनी या मुसलमान सरदारांचा सतत अपमान केला.


स्वराज्यासाठी बलीदान करून इतिहासात अमर झालेले शंभूराजे
शेवटी पापी औरंग्याने त्यांचे डोळे फोडले, जीभ छाटली तरीही राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही. दुष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या. त्यांच्या दिव्य धर्माभिमानाबद्दल त्यांना हे सारे भोगावेच लागले. १२ मार्च १६८९ या दिवशी गुढीपाडवा होता. हिंदूंच्या सणाच्या दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी ११ मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. भाल्याला त्यांचे मस्तक टोचून मोगलांनी त्याची धिंड काढली. अशा प्रकारे १ फेब्रुवारी ते ११ मार्च असे ३९ दिवस यमयातना सहन करून संभाजीराजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले. धर्मासाठी बलीदान करणारा हा राजा इतिहासात अमर झाला. औरंगजेब मात्र राजधर्म पायदळी तुडवणारा इतिहासाच्या दरबारातील गुन्हेगार ठरला.


संभाजीराजांच्या बलीदानानंतर महाराष्ट्रात क्रांती घडली
संभाजीराजांच्या या बलीदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला.`गवताला भाले फुटले आणि घराघरांचे किल्ले झाले, घराघरातील माता-भगिनी आपल्या मर्दाला राजाच्या हत्येचा सूड घ्यायला सांगू लागल्या', असे त्या काळाचे सार्थ वर्णन आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला, ही तीनशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली. यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत गेले आणि सैन्याची संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली. जागोजागी मोगलांना प्रखर विरोध सुरू झाला आणि अखेर महाराष्ट्रातच २७ वर्षांच्या निष्फळ युद्धानंतर औरंगजेबाचा अंत झाला आणि मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागून हिंदूंच्या शक्‍तीशाली साम्राज्याचा उदय झाला.
२७ वर्षे औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी केलेल्या संघर्षात हंबीरराव, संताजी, धनाजी असे अनेक युद्धनेते होते;

परंतु या लढ्याला कलाटणी मिळाली ती संभाजीराजांच्या बलीदानातून झालेल्या जागृतीमुळेच.

आणि ज्यांच्यासाठी संभाजी महाराजांनी बलीदान केले त्या महाराजांना हिंदु समाजाने काय दिले साडे तिनशे वर्षे हेटाळनी, बदनामी, बदफैली राजा म्हनुन त्यांचा कालाकुट्ट इतिहास रचला गेला

जाणिवपुर्वक त्यांची बदनामी करण्याचे षड्यंत्र रचले गेले काय दिले नाही आम्ही त्यांस.

ज्यांची कृतज्ञता बाळ्गायची त्याची बदनामी करण्याचे कुकर्म आम्ही करत राहीलो


अरे आम्ही माफिच्या पण लायकीचे नाही आहोत..


तरी पण महाराज आम्हास क्षमा करा..


ह्या निस्सीम भक्ताचा आपणास मानाचा मुजरा...!!

मराठ्यांचा राजा छत्रपती संभाजी..

ते 'राजे' नव्हतेच. विदुषकी पोशाखात बाद्शहासमोर पेश केले जाणारे 'बळी' होते. राजचिन्हाची एकच खुण नाचिज म्हणुन कुनीही उचकटुन न टाकल्याने त्यांच्या अंगावर तशीच होती आणि तीही आबासाहेबांनी दीनरात छातीवर वागविलेली.चौसष्ट कवड्यांची फक्त भवानी माळ ! संगसोबतीला एकच माणुस होते - कुठल्या कुठे कनोज देशात उपजलेला एकमेव कवी - छंदोगामात्य- कुलएख्त्यार कुलेश.
सरदारखान, हमिदुद्दिन, इखलास-मुकर्रब यांनी कैदयांना चौफेर कडेकोट घेर टाकनारी फौजेची हत्यारबंद शिस्त लावुन घेतली.
हात रश्यानं जखड्लेल्या दंडात काढ्ण्या आवळ्लेल्या कैद्यांच्या भोवती हजारो हशम तळ्पत्या नंग्या तेगी नाचवत हारीने उभे ठाकले.

शाही शहाजणे, तुता-या, नगारे, चौघडे यांची एकमेकात मिसळ्ती घोष गर्दी उसळ्ली.
बेहोश हशमांनी नरड्याच्या घाट्या फोडत किलका-या उठविल्या -
"धी~न धी~न."

निघाली काफर कैद्यांना कडेकोट बंदोबस्तात घेराने जखडुन धिंड निघाली. औरंगजेबाच्या पु-या हयातीत त्याने सग्या भावांपासुन कैक गनीमांची बेरहम कत्तल केली होती. पण आज त्याच्या हुकमाने निघनारी ही अशी पहिलीच धिंड होती. का घेतला होता त्याने असा निर्णय ?
एकाच हेतुने. ही अशा धिंडेची खबर मराठा मुलुखात गावोगाव पांगेल - वार-यासारखी. ती एकुन हाय खाल्लेले जिंदे मरहट्टे आपसुक झकत येतील तसलीम करत मन्सबीची खील्लत मागायला. पडला मराठी मुलुख एकदाचा. की करुन टाकता येइल कांजीवरमपासुन तहत काबुल पर्यंतचा पट्टा इस्लामचा बंदा !! आनि त्या आफाट सल्तनतीची राजधानी देहली !


मोतद्दारांनी हाती धरलेले कैद्यांचे काढनीबंद खेचले. राजे - कुलेश तिरपागडत त्या झट्क्याबरोबर ओढ्ले गेले.
भवतीच्या जमावातुन शेलक्या शिव्या कल्लोळू लागल्या -
"नाबका~र लई~म, मोजदा - खिंचो कसके शैतानोंको !"
गेल्या नऊ वर्षात याच संब्रुरुपी संभाने त्यांची बुर-हानपुर, औरंगाबाद अशी कैक ठानी तसनस केली होती.
कैक सुरम्या लढ्वय्यांना मौतीचे कंठस्नान घातले होते. फकीर फकीराण्याला जिम्मा रोजचा नमाजसुद्धा
नामुमकीन केला होता. त्यांचा हा नुसता घुस्साच नव्ह्ता - शक्य असते तर सपासप हत्यारे चालवुन त्यांनी
दोन्ही कैद्यांचे एकाच गोळ्यात केव्हाच गाठोडे केले असते.


जे पाय रूजाम्यांच्या पायघड्यांवरुन आत्मविश्वासाने रुपत, चालत आजवर आले होते तेच छत्रपतींचे रक्तदाट
गुब्बार पाय आज पेडगावच्या वाळ्वंटात फरफटत चालले. ज्या देहाने रायगडावर सोन्याच्या झुलेनं सजलेल्या
हतीवरुन राजा म्हणुन मिरवुन घेतले होते तोच जखडबंद देह धिंडीचा भोग भोगु लगला.


बहादुरगडात दिवान इ आमचा दरबार खचाखच भरला होत. त्यात सगळीकडुन आलेले मोगली सरदार,
सर्जाखाणासारखे इदलशाही, कुतुबशाही सरदार, सर्वात आघाडीला शह्जादे कदमबर नजर बांधुन दरबारी रिवाजाप्रमाणे खडे होते.
'' पेश करो दरबारके सामने नापाक काफ़र कैदियोंको !'' आसदखानाने आपल्या अली हजरतांचा हुकुम मुकर्रबला सुनावला.
मुकर्रबने इखलासला नजरइशारत करताच दहापाच हाशमांनी घेर टाकलेले, दख्खनेत आल्यापासुन औरंगला घोर
लावलेले दोन्ही कैदी दरबार्च्या मधोमध पेश घालण्यात आले. कैदी ताठ होते. कधी नव्हत्या
एव्हढ्या आनंदाच्या उकळ्या बुढ्या औरंगच्या काळजात उसळुन उठल्या. कधी भुलून वा चुकुनही तो दरबारी
रिवाज मोडत आला नव्हता. पण आज नकळतच तो त्याच्याकडून मोडला गेला. ताडकन तो आसनावरुन उठला.
कैदी संभाजीराजे आणी कुलेश यांच्या गर्दनी एव्हढ्या घेरावातसुद्धा ताठ खड्याच होत्या.
झाली ! आज ह्या क्षणाला आग्य्रातल्या दरबारानंतर मराठी दौलतीचे छत्रपती संभाजीराजे आणि दिल्ली तख्ताचा
शहेनशहा मुहम्मद औरंगजेब यांची इतकी वर्षे कुचमलेली नजरभेट झाली. जसे मानसातल्या मर्दपणाला
राजकारणातले गाळीव कपट न्याहाळत होते ! काफरी जिंदादीलीला तख्तनशीन शाही मगरुरी पारखत होती.
या क्षणी मात्र एक चमत्कारीक खयाल त्याच्या मनाला धडक देऊ लागला.


"कैसे पैदा करते हैं परवरदिगार ऐसे बेडर सुरमा शख्स काफरों कें खोकमें ? नही तो हमारा कमअस्सल
बगावतखोर बच्चा ! क्या नाम भी रख्खा हमने उसका शाही शोहरतसे - बडे आब्बाजान की याद जागाने -
अकब्बर !!"


झाली खुशी कुठेतरी बाहेर ओतुन टाकण्यासाठी बैचेन झालेला शहेनशहा हिंदोस्थान सिंहासनासमोरच्या
रुजामेदार पाय-या शांतपणे उतरुन आज पहिल्याने दरबारी मसनदीच्या गालिच्यावर आला. झणभर
त्याने दरबारभर नजर फिरवली आनि मक्केकडे तोंड करुन, आस्मानाकडे बघत त्याने खुशीच्या
नमाजासाठी गुढगे टेकले. !!!
दरबाराबरोबर छत्रपती संभाजीराजेही तो नजारा बघत होते. एवढ्या जीवघेन्या विटंबनेनंतरही
त्यांच्यातला 'बुधभुषणम' चा रचनाकार काव्यप्रेमी, मराठ्मोळा जातिवंत राजा उफाळुन आला.
छंदोगामात्य कवी कुलेशांच्याकडे रोखुन बघत भरला दरबार थरकुन जाईल अशा संथ पण
ठणठणितन राजबोलीत ते म्हणाले,
"छंदोगामात्य, करुन दावा या औरंगला बघताना काय वाट्तं त्याचं काव्य ! या क्षणी !
हाती कलम नाही असं न म्हणता !"
कवी कुलेश त्या नुसत्या शब्दांनीच ढवळुन निघाले. झट्कन गर्दन वर घेत कनोजी शब्द आपोआप
त्यांच्या ओठातुन त्वेषाने बाहेर प्रकटले - जो आग्या - सुनिए -


"राजन् हो तुम साँचे खुब लडे तुम जंग !
तुव तप तेज निहारके तखत त्यजत औरंग !!"

Sunday, October 17, 2010

स‌ंभाजी महाराजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी? - भाग 3

स‌ंभाजीराजे. मराठी राज्याचे वारसदार. ते स्वराज्याच्या शत्रूस जाऊन मिळाले. गोष्ट मोठी दुर्दैवी आहे. स‌ंभाजी राजांच्या चरित्रावरील हा स‌र्वात मोठा, कोणत्याही युक्तिवादाने, कोणत्याही कारणाने पुसला न जाणारा कलंक आहे.

एरवी स‌रदार, वतनदार यांनी असे पक्षांतर करणे ही तर त्या काळची रीतच होती. माणसं निजामशाहीतून आदिलशाहीत, आदिलशाहीतून मोगलांकडे अशी जात-येत असत. खुद्द औरंगजेबाचा मुलगा मराठ्यांना स‌ामील झाला होता. पण संभाजीराजे हे काही स‌ामान्य जहागिरदार, वतनदार, स‌रदार नव्हते. ते कोणा भोसलेशाहीचे वारसदारही नव्हते. शिवाजीराजांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. ते रयतेसाठीचे राज्य होते. ते हिंदवी स्वराज्य होते. श्रींच्या इच्छेने झालेले ते राज्य होते. आणि म्हणूनच संभाजीराजांचे पक्षांतर ही स‌र्वांचेच काळीज खाणारी गोष्ट बनली होती. प्रा. वस‌ंतराव कानेटकरांनी तर स‌ंभाजीराजांच्या या कृत्यामुळे शिवरायांना एवढा धक्का बसला, की ते खचलेच, असे म्हटले आहे. "शिवछत्रपतींच्या दिग्विजयाने हिंदवी स्वराज्याचा वृक्ष महाराष्ट्राबाहेरही फोफावत असता, त्याच्या (संभाजीच्या) हातून शत्रूस मिळण्याचा अविचार घडून आला. त्याबद्दल इतिहास त्यास कधीच क्षमा करू शकत नाही," अशा शब्दांत डॉ. जयसिगराव पवार यांनी आपला क्षोभ व्यक्त केला आहे.

हे सर्व असले, तरी एक प्रश्न उरतोच, की छत्रपतींसारख्या युगपुरुषाचा हा पुत्र, छत्रपती आणि जिजाऊंच्या स‌ंस्कारात वाढलेला हा सुसंस्कृत युवराज, एकाएकी उठतो आणि शत्रूच्या गोटास जाऊन मिळतो, ते कोणत्या कारणाने?

औरंगजेबाच्या आदेशाने दिलेरखानाने स‌ंभाजीराजांस आपल्या बाजूस आणण्यासाठी जे पत्र लिहिले त्याला उत्तर म्हणून स‌ंभाजीराजांनी एक गुप्त पत्र पाठविले होते. त्यात त्यांनी म्हटले होते, "माझ्या हिताची म्हणून तुम्ही जी गोष्ट स‌ांगितली ती तशी घडून येईल, याहून वेगळे नाही, असे माझ्या मनात आहे. आपल्या पत्रातून मला असे दिसून आले की, स‌र्वांची मने एकच असतात. परंतु ज्या प्रदेशाची जबाबदारी माझ्यावर स‌ोपवून दुसरा प्रदेश जिंकण्यासाठी अगदी बिनधास्तपणे माझे वडील निघून गेले आहेत ते इथे परत येईपर्यंत मी आपण स‌ुचविलेली मोहीम स्वीकारू शकत नाही. आपल्या हिताकडे दुर्लक्ष करून मी माझ्या वडिलांची आज्ञा मोडणार नाही. परंतु आपल्या पराक्रमाने जिंकलेल्या वैभवाने मी त्यांना स‌ंतुष्ट करीन. स्वतःची खरी योग्यता स्वीकारण्यात परिश्रम कसले? आणि दिल्लीपती माझ्या बाजूस आल्यावर काय स‌ांगावे? (ही चांगलीच गोष्ट आहे.) माझ्या बाजूचे म्हणून आपण मला पाठविलेले पत्र आपल्या प्रेमाचे प्रतीक आहे. मैत्रीच्या बाबतीत आधार आहे. आपण आपल्या पत्रामध्ये 'आपला' असे संबोधून स्नेह जुळविला आहे. तो स्नेह प्रत्यक्षात स‌ाकार होईल अथवा नाही, याबद्दल मुळीच संशय नको." (परमानंदकाव्यम्, संपादक - गो. स. स‌रदेसाई, बडोदा, 1952, पृ. 78, श्लोक 22-31)

या पत्रातील 'मी माझ्या वडिलांची आज्ञा मोडणार नाही' हे उद्गार काय सांगतात? मनात चलबिचल असताना, स‌ंभाजीराजांच्या मनात वडिलांबद्दल अशा भावना होत्या. आणि तरीही ते मोगलांना जाऊन मिळाले, म्हणजे त्यासाठी तसेच काही कारण असले पाहिजे, तशीच काही परिस्थिती निर्माण झाली असली पाहिजे किंवा निर्माण केली गेली असली पाहिजे.
काय होते ते कारण? काय होती ती परिस्थिती?

6 जून 1676 रोजी शिवराज्याभिषेक झाला आणि 13 डिसेंबर 1678 रोजी संभाजीराजे दिलेरखानास मिळाले. शिवराज्याभिषेकानंतर रायगडावर गृहकलह निर्माण झाला. राजाभिषेक प्रसंगीच आपणास पट्टराणीचा मान मिळाला तरी आपल्या पुत्रास युवराजपदाचा मान न मिळता तो स‌ंभाजीराजांकडे गेला, याचा अर्थ राज्याचा वारसा आपल्या मुलाला मिळणार नाही, याचे दुःख स‌ोयराबाईस झाले असले पाहिजे असा तर्क 'शिवपुत्र स‌ंभाजी'कार डॉ. कमल गोखले करतात. जिजाऊसाहेबांच्या मृत्युनंतर स‌ोयराबाईंच्या मनातील या विचारास प्रकटीकरणाचे धैर्य झाले असणार.

या काळात एकीकडे स‌ोयराबाई अस्वस्थ झाल्या होत्या आणि दुसरीकडे अष्टप्रधानमंडळातील काही प्रधानही संभाजीराजांवर नाराज होते. शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार स‌ंभाजीराजे राज्यकारभारात लक्ष घालू लागल्यानंतर त्यांच्या आणि प्रधानांच्या वितुष्टास प्रारंभ झाला असावा. यातून रायगडावर अशी परिस्थिती निर्माण झाली, गृहकलह इतका टोकाला गेला, की अखेर राज्याच्या वाटण्या करण्याइतपत पाळी आली. कवि परमानंदाचा पुत्र देवदत्त याने रचलेल्या 'अनुपुराणा'वरून मुळातच शिवाजी महाराजांना राज्याचे विभाजन मान्य नव्हते. त्यासाठी त्यांनी राजारामासाठी वेगळेच राज्य निर्माण करण्याचा पर्याय शोधून काढला, असे दिसते. पण स‌ोयराबाई आपल्या पुत्रासाठी महाराष्ट्र देशीचे राज्य मागत होती आणि महाराज कर्नाटक देशीचे भावी राज्य त्यास देतो असे म्हणत होते. "1975-76 या कालखंडात राज्यविभाजनाचा प्रस्ताव रायगडावर चर्चिला गेला आणि शिवाजी महाराजांनी थोड्या नाराजीने का होईना पण त्यास आपली संमती दिली. असे वाटते की पितापुत्रांच्या बेबनावाला इथूनच स‌ुरुवात झाली. संभाजीराजास राज्याचे विभाजनच मंजूर नव्हते. कारण महाराज कर्नाचकात जे जिंकणार होते, तोही मराठी राज्याचाच एक भाग बनणार होता." या स‌र्व राजकारणात मोरोपंत, आण्णाजी दत्तो, राहुजी स‌ोमनाथ, प्रल्हाद निराजी, बाळाजी आवजी यांची भूमिका युवराज स‌ंभाजीराजांना विरोध करण्याची व राणी स‌ोयराबाईंचा पक्ष उचलून धरण्याची होती.

याच काळात शिवरायांनी दक्षिण दिग्विजयाची तयारी स‌ुरू केली होती. 6 ऑक्टोबर 1676 रोजी दस-याच्या मुहुर्तावर महाराजांनी कर्नाटक स्वारीसाठी प्रयाण केले. मात्र आपण रायगडावर नसताना, तेथे स‌ोयराबाई आणि त्यांच्या गटाच्या कोंडाळ्यात स‌ंभाजीराजांना ठेवणे योग्य ठरणार नाही, हे शिवरायांनी जाणले होते. तेव्हा त्यांनी स‌ंभाजीरांना कोकणातील शृंगारपूर येथे धाडले. शृंगारपूर हे येसूबाईंचे माहेर. त्या प्रदेशाच्या कारभाराची जबाबदारी छत्रपतींनी स‌ंभाजीराजांकडे स‌ोपविली. याच ठिकाणी स‌ंभाजीराजे शाक्त पंथीयांच्या प्रभावाखाली आले. तेथेच कवि कलशाने पुढाकार घेऊन राजांचा कलशाभिषेक केला.

एप्रिल-मे 1678च्या स‌ुमारास शिवाजीराजे कर्नाटक स्वारीवरून परतले. पण इतिहासकारांच्या मते त्यानंतर शिवाजीराजे आणि स‌ंभाजीची भेटच झाली नाही. रायगडावर परतल्यानंतर शिवाजीराजांनी स‌ंभाजीराजांना शृंगारपूरहून स‌मर्थभेटीसाठी स‌ज्जनगडास जाण्याचा हुकूम दिला. गडावरील धार्मिक वातावरणात स‌ंभाजीराजांचा राग शांत होईल, असे छत्रपतींना वाटले असावे. 'अनुपुराणा'नुसार शिवाजी महाराजांनी स्वहस्ते पत्र लिहून स‌ंभाजीराजांना कळविले, की "तू प्रजेला अभय देतोस, पण प्रजा कर बुडवीत आहे. तू अमात्यांचा उघड अपमान करीत आहेस‌. तरी शृंगारपुराहून उठून तू स‌ज्जनगडास जा." स‌ंभाजीराजे स‌ज्जनगडावर गेले, पण तेथे रामदासस्वामी नव्हते. तेथेच दिलेरखानास जाऊन मिळण्याचा स‌ंभाजीराजांचा विचार पक्का झाल्याचे दिसते. स‌ंगम माहुलीस तीर्थस्नानास जातो म्हणून त्यांनी स‌ज्जनगडच्या किल्लेदाराचा निरोप घेतला आणि माहुलीवरून ते थेट दिलेरखानाच्या छावणीत जाऊन पोचले.

स‌ंभाजीराजांचे 24 डिसेंबर 1680चे एका ब्राह्मणास दिलेले दानपत्र उपलब्ध आहे. त्यात त्यांनी आपल्या या कृत्याचे स‌मर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की "राणीचे (सोयराबाईचे) मन स्फटिकासारखे निर्मळ होते. पण कुटिल मंत्र्यांनी दुष्ट स‌ल्ला दिला की मोठ्या मुलाला गादी मिळता कामा नये. या स‌ल्ल्याचा प्रभाव तिच्यावर पडला. राजाने राणीच्या बाजूने पक्षपात केला. त्यामुळे तो आपल्या विरुद्ध झाला. असे असूनही त्याने आपल्या वडिलांच्या स‌ेवेत आणि निष्ठेत काही म्हणता काही कसूर केली नाही. आपल्या कर्तव्यपालनात तो स्वतः (संभाजी) दशरथी रामाप्रमाणे होता. त्याने दीड कोटी रूपयांची दौलत, किल्ले, राजाचा दर्जा, मान आणि सन्मानही गवताप्रमाणे तुच्छ मानून त्यांचा त्याग केला." (छत्रपती शिवाजी - स‌ेतुमाधवराव पगडी, पृ. 142)एकंदर राणी स‌ोयराबाई आणि प्रधानांनी केलेल्या कुटील कारवायांमुळे स‌ंभाजीराजांना मोगलांना जाऊन मिळण्याचे कृत्य करावे लागले, असा या मजकुराचा मथितार्थ आहे.

या कारवाया कोणत्या होत्या?
संभाजीराजांना राज्य मिळू नये यासाठी या लोकांनी कोणते मार्ग अवलंबले? या प्रश्नाच्या उत्तरातच स‌ंभाजी राजांची बदनामी कोणी केली या स‌वालाचे उत्तरही दडलेले आहे!

डॉ. जयसिंगराव पवार स‌ांगतात -
"...कुटिल राजकारणी व मत्सरग्रस्त प्रधान एकत्र आल्यानंतर या दोहोंच्या स‌मान प्रतिस्पर्ध्यास - स‌ंभाजीराजांस - हतबल करण्यासाठी अनेक डावपेच लढविणे आवश्यक ठरले. स‌ंभाजीराजांचे चारित्र्यहनन हा अशाच एका डावपेचाचा भाग असावा. राजकारणातील स‌त्तास्पर्धेत प्रतिपक्षाचे चारित्र्यहनन करून त्यास बदनाम करण्याची अनेक उदाहरणे आपणास अगदी अलीकडच्या इतिहासातस‌ुद्धा स‌ापडू शकतील. स‌ंभाजीराजांच्या चारित्र्याविषयी ज्या अनेक दंतकथा अथवा अफवा त्यांच्या हयातीत निर्माण झाल्या त्यांचा शोध या कुटिल राजकारणाच्या पार्श्वभूमिवर घेतला तर मग खाफीखान, मनुची आदींच्या कानापर्यंत जाऊन पोहचलेल्या स‌ंभाजीराजांच्या 'इष्का'च्या कथा मुळातच कोणी निर्माण केल्या असतील याचा अंदाज बांधता येतो." आणि मग स‌ंभाजीराजांची बदनामी करणारी बखर लिहिणारा मल्हार रामराव याचा खापर पणजोबा बाळाजी आवजी चिटणीस असतो, याचे मर्म उलगडते.


आणि नियतीचा सूड बघा ह्याच बाळाजी आवजीचा पुत्र खंडोजी ज्याने पोर्तुगिजांबरोबरच्या लढाईत महाराजांचे प्राण वाचविले.

माझ्या खंडोजी ह्या लेखात ह्या प्रसंगाचे सविस्तर वर्णन आहे..



('स‌ंभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी?' या लेखाचे तिन्ही भाग पूर्णतः डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 'मराठेशाहीचा मागोवा' (मंजुश्री प्रकाशन, 1993) या पुस्तकातील 'युवराज स‌ंभाजीराजे - एक चिकित्सा' या प्रकरणाच्या आधारे लिहिले आहेत.)