विजरई आल्वोर आपल्या साथिदारांसह, भगदाड पड्ल्या फोंड्यात,
निकराचा आखरी हमला करुन शिरन्यासाठी फौजेचि शिस्त मांडुन तयारच होता. त्याचे वाजंत्रि फिरंगी पडघम
घुमवित फौजेला चेतना देत होते. चित्राविचित्र किलका-या उठ्वीत होते.
तटावरुन हवालदिल येसाजी-कृष्नाजी कंक त्यांच्याकडे बघत आपल्या धारक-यांना धीर देत गरगर फिरत होते.
आता फोंडा होता जिवा-मरणाच्या ऐन टोकावर. थोडा अवधी झाला तर....
एवढ्यात उठल्या ! हर हर म्हाद्देव'' च्या गगनस्पर्शी मर्दान्या कीलका-या उठल्या.
सरसरत येत्या धुळ्लोटांतुन फड्फडत येणारा भगवा जरीपट्का येसाजी-कृष्नाजिंना तटावरनं दिसला.
पुरा फोंडा कोट तो बघताना चैतन्याने कसा सळ्सळुन उठला. ऐलतीराला त्याने साद दिली 'हर हर म्हाद्देव '
फोंडाही पैलतिरावरुन कडाडला.
मध्ये सापडलेले फिरंगी गोंधळुन मागे वळ्ताना
कुजबुजु लागले - '' ता पळय. राजा इलो !'' हा, हा म्हनता विजरईने अंग मोडुन मांड्ल्या सैन्याची
शिस्त पार विस्कटली. तसे तटावरचे मावळे तर आनंदी जल्लोषाने आरोळ्या ठोकू लागले.
भिडले ! पायदळ मध्ये घेवुन पाचहजार घोड्दळासह संभाजीराजे थेट कोट फोंड्याच्या पायथ्याला भिडले.
घेराचा आता रंगच पार पालटला. बगलेला उभ्या एकाही फिरंग्याची हत्याराला हात घालायची हिमंत काही झाली नाही.
राजांचा तो उपराळ्याचा हल्ला नव्हताच. होता फोंडा गडचढीचा हमेशाचा प्रघात !
फोंड्यावर आता चक्क नौबती दुड्दुडु लागल्या !
येसजींनि आज आठ दिवसानंतर फोंड्याचा दरवाजा उघड्ला. सामने थोरल्यांचे अंकुर,
तडफदार, बांडे राजे बघताच डोळे अनेक आठवनिंनी डबडबुन आले म्हतारबाचे.
रिवाज ध्यायला ते कमरेत वाकताहेत हे बघुन राजे चट्कण पुढे झाले.
ऐन भराचे राजे आणि उतारवयाचे येसाजी यांची कड्कडुन उरभेट पडली.
गोव्यातल्या. किल्ले फोंड्यावर !
''कंक काका तटातील धारकरी बाहेर काढा टाकोटाकीने. फिरंगी माघार घेनार काढत्या पायांनी.
त्यांचा आताच पाठलाग केला पाहिजे !''
''जी.'' येसाजी-कृष्नाजी घायपाती, लवलवत्या पानांसारखे हलु लागले.
राजांनी अंदाज बांधला तसेच झाले होते. विजरईने माघारीचा हुकुम देताच,
त्याचीच वाट बघनारे त्याचे सैनीक आल्या वाटेने परतीसाठी सैरभैर पळु लागले.
दुर्भाटजवळ मावळी घोडाइतांनी माघार घेउन दौडत्या. फीरंग्यांना गाठले. मोर्चे धरलेल्या फिरंगी बंदुका कडकडल्या.
मावळी घोडी बिचकुन मूस्काटे फिरवु लागली. ते पाहुन येसाजी पुत्र कृष्नाजीच बिथरला !
त्याने आभाळाकडे गर्दन उठवुन सर्व घोडाइतांचे पाठकणे सुरसुरुन फुलवीत केवढीतरी मोठी किलकरी दिली.
''हर हर हर म्हाद्देव.'' ती लढाई होती दौडत येना-या मावळी भालाइतांची आनि बंदिस्त मोर्चे धरत
माघार घेना-या फिरंगाई बंदुकधा-यांची. फिरंगी मोर्चे पार विस्कलित झाले. घुसलेल्या काही मावळी
भालाइतांच्या भाल्यांच्या मा-यातुन खुद्द विजरई दोन वेळा नशिबाने सलामत निसटला होता.
कित्येक फिरंगी नदितुन पोहोत होते. कैक गळाभर पाण्यात जिव मुठीत धरुन उभे होते.
भेदरलेल्या विजरईने त्या लोकांची दुर्दशा डोळ्यांनी पाहीली.
आनि आनि अंगभर रक्ताने न्हालेला, मोर्चामागुन मोर्चे फोडत चाललेला,
अंगी गोळयाच गोळ्या झेलून फुलल्या पळसवृक्षासारखा रक्तबंबाळ दिसनरा,घामेजलेला कृष्नाजी
छाताडावर वर्मी गोळी लागताच ग्लानी येवुन घोड्यावरुन कोसळला !! ज्या ठिकानी जाया झालेले येसाजी,
कांबळ्यावर आणुन ठेवले होते त्या जागी, त्यांच्याशेजारीच कृष्नाजीलाही मावळ्यांनी घोंगडीवर झोपवीले.
आता दोन्हिकड्चा मार सुमार झाला होता. कित्येक फिरंगी आणी मावळे कामी आले होते. सांजावत आल्याने हत्यारे थांबली होती.
महाराज घोंगडिवर झोपविल्या येसाजीजवळ आले.
त्यांना बघुन क्षीन आवाजात म्हातारबा येसाजी म्हणाले, "सुक्षेम हाईसा न्हवं ?"
काय बोलावे तेच राजांना सुचेना. ते कृष्नाजीच्या घोंगडिजवळ आले. ती घोंगडीच रक्ताने चिंब झाली होती
कृष्नाजीने ग्लानीने भरलेले डोळे किलकिले केले. उजव्या पायपंजावर बसत राजे त्यांच्या जखमी देह्भर,
आईच्या मायेने हात फिरवित म्हनाले,
"ऐसा कैसा रे फुटोन गेलास तु कृष्णा !"
त्यांनी भवतिच्यांना आज्ञा केली, "या बापलेकास आत्ताच क-हाड प्रांती डोलीतुन त्यांच्या गावी पोचवा."
नेसरीच्या प्रतापराव गुजरांची,पुरंदराच्या मुरारबाजी आनी घोडखिंडीच्या बाजी देशपांड्यांची, मरणाचा लाकडी खोडा वळ्ता करूण घेना-या जंजी-याच्या कोंडाजी फर्जंदांची याद व्हावी असाच हा प्रसंग होता
- गोव्याच्या कृष्नाजी कंकाचा..
No comments:
Post a Comment