जंजी-याचा तट आता पार उध्वस्त झाला होता. किनारपट्टीवरच्या टोपिकर, फिरंगी वखारिनी तर मुंबई, सूरत, गोवा आशा आपल्या बड्या दरबाराना खलीते धाडले - " सिद्दी खैरतची आता खैर नाही राजा शंभू जंजिरा दर्यात डूबवल्याखेरिज माघारी परतत नाही !."
जंजीरा आता एकाच जबर धड्केचा धनि होता. पंधरावा दिवस फटफटून उठला. नेहमिसारखे बख्तरधारी छत्रपति शहजाद्यासह शामियान्याबाहेर पडले. आज त्यांची चर्या मात्र वेगळीच दिसत होती.
"दादाजी दर्याची ओहोट केंव्हापासुन धरते ?" छत्रपतींनि सवाल टाकला.सवाल गोंधळात टाकनारा होता.
"कालपासुनच ओहोटीला सुरुवात झाली महाराज." दादाजी उत्तरले.
"महाराज गड़ी सोडायचा हुकुम व्हावा." येसाजी कंक आदबीने म्हणाले.
"नाही कंक काका, ही होड्क्याची विसकी पान्यावरून दूर हटवा. भुईला घ्या ती." कुणालाही न कळनारा हुकुम छत्रपतींच्या तोंडून सुटला.
"जी~! " येसाजी चमकले
असंख्य हाताने होड्या किना-यावर घेतल्या गेल्या.
एका एकी सर्वांनाच चक्रावून टाकतील असे पहाड़ी, हिमतवान, हुकुमी शंभूबोल साक्षात् दर्याच्या ही पोटात गोळा उठवित बाहेर पडले-
" ही खाड़ी भांगा देते तर जंजिरा आता पडतोच आहे ! सरलश्कर, दादाजी, विसाजी तळाचा हर एक धारकरी मेहनतिस जुंपा दगडगोट,लाकुडकाठी, कपडगोनी जे मिळेल त्याने भरतिपुर्वी ही खाड़ी रिचवून टाका !! जंजिरा पाडनेच आहे. आबासाहेबांस त्याविना शांति नाही, आम्हास चैन नाही"
निखारे पाखडत पसरावेत तसे बोल आज्ञा देत उधळले.
" बुजवून टाका हि खाडी."
पुराणात कधी काली प्रभु रामचंद्राचे नाव घेवुन सेनापति जाम्बुवंताने अशीच आज्ञा दिली होती वानर सेनेला.
हर हर महादेव म्हणत मावळी सेनेने रांगा धरल्या. एकमेवद्वितीय मात्र अगळा वेगळा यज्ञ सुरु झाला साक्षात् पानयज्ञ. !
दगड, विटा, लाकुड, फाटी मिळेल ते खाडीच्या वासल्या जबड्यात लोटन्यासाठी मावळी तुकड़यानी शिस्त धरली. पंधरावा दिवस मावळला.
सतत १० दिवस शेकडो मन चिजवस्तु पाण्यात अखंड कोसलली होती. खाडीचे पानी आता किना-याचा बांद फोडून हाताहातानी चौवाटा पसरु लागले.
एव्हडे दिवस एका एकी बंद झालेल्या तोफा बघून मरहटटयांची चाल काय याचा अंदाज पकडण्यासाठी सिद्दी खैरत व कासम जंजी-याच्या तटावर येवून किनारा निरखु लागले त्याना काहीच उमगेना.
पंचविसावी सांज कलतिला आली आणि सिद्दी खैरतच्या खोपडीत मशाल लागली !
" या खुदा~ ! तो~बा !" इंगलि ड़सल्यागत तो चित्कारला.
त्या रात्रि जंजिरा आपल्या हबशी हशमांवर सोडून हाय खाल्लेल्या सिद्दी खैरत- कासमनि एका होडीतुन चक्क जंजिरा सोडला ! दर्यात एका खड्काळ टेकडी वर ते जावून ठान झाले.
खाड़ी बगलांनि पसरु लागली ! फत्ते आणि फत्तेच तोंडावर दिसू लागली. अंगावरचा मळका जामा फेकून द्यावा तसे आज छत्रपति खाड़ीला पुरते हटवनार होते. मग कोंडला मर्दाना, हत्यारे पेलत जंजी-यावर थेट सुल्तानढवाच बडविनार होता ! हा सल निखळनार होता- कायमचा !
जे समोर चालले होते ते मावळ्यांचे 'दर्याभांडन' बघून पार दडपून गेलेला औरंगपुत्र अकबर शेजारी उभ्या दुर्गादासकडे हेतुपुर्वक पाहत म्हणाला
"राजासाब, आप खाते है क्या बिलकुल नाचीज है ! करते जो है वो खास दक्खनी मरहटटी !"
जंजी-याची मोहिम महाराजांना अर्धवट सोडावी लागली पण संभाजी महाराजांनि जंजिरा कायमचा खिळखिळा केला सिद्दी परत डोके वर काढू शकला नाही.
No comments:
Post a Comment